



शिवसमर्थ प्रतिष्ठान पुणे,
शिवाजी चंद्रकांत खांडेकर (सर)
मागील वीस – बावीस वर्षे शिक्षण क्षेत्रातील शाळा व कर्मचाऱ्यांसाठी तसेच शिक्षण क्षेत्रासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत असताना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मा. शिवाजीराव खांडेकर (सर)यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली संस्था म्हणजे शिवसमर्थ प्रतिष्ठान शिक्षण आणि शिक्षण क्षेत्र याविषयीची कमालीची आस्था असणारी ही संस्था उद्याला येत आहे. उपेक्षित, वंचित घटकातील विद्यार्थी …उदासिनतेमूळे मुख्य प्रवाहाबाहेर फेकले जात आहेत. गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना आधार देणे हे या संस्थेचे प्राधान्यक्रमाने प्रथम कर्तव्य आहे..ही खांडेकर सरांची उपजत तळमळ आहे. स्वतः खांडेकर सर हे प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन केलेले नेतृत्त्व आहे. गगनभरारी घेऊनही मातीशी नाळ असणारा संघटक अशी त्यांची ख्याती आहे. त्यामूळे या संस्थेच्या माध्यमातून गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना आधार मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिध्द करु पाहाणाऱ्या अनेक प्रज्ञावान युवकांना यातून आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे. मा. शिवाजीराव खांडेकर (सर) हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून घडलेले प्रगल्भ आणि विवेकी नेतृत्व आहे. विद्यार्थ्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या गुरुजनांविषयी त्यांच्या मनात आदराची, आपुलकीची भावना आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करुन..त्यातून समाजाला प्रेरणा देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर विनाअनुदानित तत्त्वावर शासनाचा एकही रुपया पगार नसताना विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय काम करणाऱ्या निवडक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आर्थिक हातभार देऊन मदत करणे. .हा या संस्थेचा उद्देश, आजची गरज सिध्द करणारा आहे.
शिवसमर्थ संस्थेसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनी मनापासून पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. क्रियाशील सभासदत्वाच्या माध्यमातून आपण या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. प्रत्येकांनी मदतरुपी खारीचा वाटा उचलला तर राज्याला अभिमान वाटावा..असे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. आपण व्यक्तिगत, हितचिंतक तसेच समाजातील मान्यवर व दानशूर यांचे कडून सहकार्य व मदतीची अपेक्षा. ही विनंती!
कार्यरत पदे
- सरचिटणीस : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
- संस्थापक अध्यक्ष : शिवसमर्थ प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
- जनरल सेक्रेटरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा, शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ
- राज्य संघटक : महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक हक्क परिषद
- समन्वयक : सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
- समन्वयक : संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती
- संचालक : राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळ
- संचालक : पुणे विभाग माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी पतसंस्था, सातारा
- सचिव : पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना
- कार्याध्यक्ष : पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतसंस्था, पुणे
पुरस्कार
- पुणे सोशल फाउंडेशन च्या वतीने गौरव पुरस्कार
- भारत दर्शन राष्ट्रीय महोत्सव पुणे यांच्या वतीने गौरव महाराष्ट्र पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघटना यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार
- काव्य मित्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय काव्यगौरव पुरस्कार
- सुपर ब्रेन इंडिया यांच्या वतीने विद्या प्रेरणा पुरस्कार
- पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने गुणवंत पुरस्कार
शैक्षणिक क्षेत्रातील ठळक कार्य
- शालेय कर्मचाऱ्यांच्या पदांबाबत शासनातर्फे नेमण्यात आलेल्या समितीत सहभाग.
- सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची मार्गदर्शक पुस्तिका काढण्यात पुढाकार.
- ऑनलाईन वेतनप्रणाली बद्दल तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य व विविध जिल्ह्यात प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन.
- विविध वर्तमानपत्रातून व मासिकातून वेळोवेळी शैक्षणिक समस्येबाबत विविध प्रकारचे लेखन.
- सेवापुस्तक मार्गदर्शिका तयार करण्यात पुढाकार.
- संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार.
- सेवक संच निश्चितीचे सॉफ्टवेअर तयार करण्यामधये सहभाग.
- पुणे जिल्ह्यामधे दरवर्षी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन.
- अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे आयोजनात सहभाग.
- कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कारांचे आयोजन.
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे आयोजनात सहभाग.
- कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या तालुक्यात व जिल्ह्यात मेळाव्याचे आयोजन.
- संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलने.
- महिला अत्याचार विरोधात वेळोवेळी आंदोलने.
- नैसर्गिक आप्तीच्या वेळी मुख्यमंत्री सहायत्ता निधी जमा करण्यात पुढाकार.
- शिवसमर्थ प्रतिष्ठानची स्थापना करून, त्या माध्यमातून गरजु व हुशार विद्यार्थ्यांना मदत.